shamburaj-desai
shamburaj-desai 
मुख्य बातम्या मोबाईल

गृहराज्यमंत्री शंभूराज देसाईंचा दुचाकीवरुन साताऱ्यात फेरफटका

सरकारनामा ब्युरो

सातारा : राज्याचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी आज पोलिस यंत्रणेचे मनोबल वाढविण्यासाठी संचारबंदीच्या काळात सर्व नियमांचे पालन करत सातारा शहरातून दुचाकीवरुन फेरफटका मारला. पोलीसांच्या आरोग्याची चौकशी करीत त्यांना सतर्क राहण्याच्या सुचना केल्या. 

कोरोनाच्या पार्श्वभुमीवर सातारा जिल्हयात सर्वत्र संचारबंदी आहे. संचारबंदीचे पालन होण्याकरीता पोलीस यंत्रणा सुरक्षेसाठी रस्त्यावर कार्यरत आहे. या कठीण परिस्थितीत पोलीस यंत्रणेचे मनोबल वाढविण्याकरीता गृहराज्यमंत्री शंभूराज देसाईंनी आज सकाळी घरातील दुचाकी बाहेर काढून सातारा शहरात ठिकठिकाणी लावण्यात आलेल्या पोलीस बंदोबस्ताच्या ठिकाणी थांबून प्रत्यक्ष पहाणी केली. सुमारे तासभर त्यांनी  शहरातील बंदोबस्तांची पहाणी केली. त्याठिकाणी कार्यरत असणाऱ्या पोलिस यंत्रणेला काही अडचण आहे का? याचीही त्यांनी चौकशी करीत बंदोबस्त बजाविताना स्वत:ची काळजी घ्या असे सर्वांना सांगितले. काही पोलीस हलगर्जीपणा करीत असल्याचेही आढळून आले. त्यावेळी त्यांनी कडक भाषेत समज दिली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT